Breaking News

नवरगाव च्या 11 वर्षीय फरहान बालकाचे 30 दिवसाचे रोजे संपन्न

कौतुकास पात्र ठरलेल्या श्रद्धारूपी शुभेच्छांचा वर्षाव

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण ) येथील अफजल खान पठाण यांचा नातू व गुलशेर खान पठाण यांच्या अवघ्या 11 वर्षीय मुलाने रमजान या पवित्र सणात नियमांचे काटेकोर पालन करीत तब्बल तीस दिवसाचे रोजे (उपवास) केल्याने सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.आज रमजान ईद दिनाचे औचित्य साधून फरहान वर श्रद्धारूपी शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

खरं म्हणजे बालपण हे खेळण्या बाडगण्याचे दिवस.यावर सपशेल मात करून समाजाप्रती देणं असल्याचा प्रत्यय फरहान ने घडवून आणला.

नवरगाव येथे वास्तव्यात असलेल्या फरहान हा केवळ 11 वर्षाचा असतांना रमजान या पवित्र महिन्यात रोजे पकडले.केवळ एक दोन दिवसच नाही तर तब्बल महिनाभर न चुकता पहाटे 3.45 उठून सर्व काही विधिवत केल्यानंतर दिवसभर तंतोतंत नियमांचे पालन करून सायंकाळी 6.44 वाजता उपवास सोडत होता.

सलग महिनाभर 11 वर्षीय चिमुकल्याने बालवयात रोजे पकडल्याने सर्वत्र कौतुकास पात्र ठरतो आहे.किंबहुना सकाळी पाच वाजल्यापासून ते सायंकाळी पावणे सात पर्यंत अन्न , पाणी त्यागून हा रोजा पूर्ण केलाय.लहान बालकाचा हा अल्लाह प्रती आदरभाव अतिशय शब्दातीत थोरल्या पर्यंत आनंददायी वातावरण तयार झाले.

दरम्यान , रमजान ईद निमित्त आज मारेगाव येथील मस्जिद मध्ये वातावरण फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.बालकांचे कडक उन्हातही काटेकोर नियमाने रोजे पकडल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment