◆ मारेगाव वैष्णवी स्टुडिओतील घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
साप$$$$ म्हटलं की मनात कमालीची धडकी बसते. प्रत्यक्षात दिसला की थरकाप सुटतो आणि असाच थरार मारेगावच्या स्टुडिओत आज बुधवारला सकाळी दहा वाजताचे दरम्यान घडला.चक्क स्टुडिओत संचालकाच्या पायावरून गेलेला धामण साप काही काळ भंबेरी उडवून गेला.
मारेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या समोर असलेल्या वैष्णवी स्टुडिओत चक्क सकाळी तीन फुटाच्या व काहीसा निळा रंग असलेला धामण जातीच्या सापाने हळुवारपणे स्टुडीओत प्रवेश केला.संचालक आपल्या कामात व्यस्त असतांना अलगदपणे संचालक अनिल निब्रड यांचे पायावरून जात असतांना काहीतरी पायावर असल्याचा भास झाला.डोकावून पाहताच लांबलचक साप दिसताच संचालकात थरकाप सुटत कमालीची भंबेरी उडाली.
लागलीच सर्पमित्र सुरज येरगुडे यांना पाचारण करून धामण जातीच्या सापाला बंदिवासात सोडण्यात आले.
परीणामी बापरे बाप..स्टुडिओत गेला साप.. च्या चर्चेने परिसरात कमालीचे उधाण आले होते.