◆ वणी ला हलविले , गंभीर युवक करणवाडीचा
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव वरून पुणे येथे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्सने एका दुचाकीस्वारास मागावून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राज्य महामार्गावर सोमवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताचे दरम्यान घडली.
भूषण संजय ढेंगळे (२१) रा.करणवाडी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.डीएनआर ट्रॅव्हल्स मारेगाव वरून भरधाव वेगाने जात असतांना धावत्या मोटारसायकलला ट्रॅव्हल्स ने मागावून धडक दिली.यात भूषण हा गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारार्थ वणी येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान , पोलीसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती.