Breaking News

पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम युवकाचे उपोषण

¶ सर्वत्र तरुणाच्या कार्याचे कौतुक
¶ आ.बोदकुरवार यांनी दिले कार्यवाहीची आदेश

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मोटार वाहन कायद्याची पायमल्ली होत असल्याने कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पवित्र रमजान महिना सुरू असताना ” रोजा ” धरीत एक मुसलीम तरुण येथील पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसल्याने प्रशासनाचे बेगडी रूप समोर आले आहे.आ.संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी परिवहन मंडळ व पोलिस विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले. तरुणाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या तालुक्यात मोटार वाहन कायद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मोटार वाहन कायदा मोडून खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल संबंधित विभागाच्या नाकावर टिच्चून राजरोस धावत आहे.यावर कोणत्याही विभागाचे अकुश नसल्याने भिनभोभाट पणाने वाहने सुसाट धावत आहेत.
या संदर्भात वारंवार संबंधित विभागांना तोंडी व लेखी निवेदन देण्यात आले.परंतु पोलिस व परिवहन कार्यालयाचा अधिकाऱ्यांना चिरीमिरी ची भेट भेटत असल्याने सर्रास कायद्याचे उल्लंघन करीत ट्रॅव्हल चालक या मार्गावर नियमबाह्य धावत आहे.दररोज या मार्गावर खाजगी १३ ट्रॅव्हल्स बिनभोबाट धावत असतात.
वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने शहरातील नवाज शरीफ कादिर शरीफ हा तरुण पवित्र रमजान महिण्यात “रोजा ” करीत दि. ४ एप्रिल पासून आमरण उपोषणाला बसला आहे.काल दी .4 रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान आ.संजीव रेड्डी बोदकुरवर, दिनकर पावडे यांनी सभा मंडपाला भेट देत परिवहन विभागाचे पवार ,ठाणेदार राजेश पुरी याना कायद्याचे उल्लंघन करून धावणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.आमदारांनी सूचना करताच 13 पैकी केवळ तीनच वाहनावर तत्परतेने कार्यवाही केली . मात्र उर्वरित वाहनावर कधी कार्यवाही होणार याकडे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment