Breaking News

‘विटा’ एक्सक्लूझिव्ह ! मातेचा धक्कादायक मृत्यू…

– ‘तिचा’ हंबरडा फोडतोय मानवी मनाची काहिली

मारेगाव : दीपक डोहणे

केवळ महिन्याभराची ती..तिला चार पाय..तिला बोलताही येत नाही अन रडताही येत नाही..मातेचं ममत्व क्षणात कायमचं विसावल..पुरती व्याकुळ झालेली ती हंबरडा फोडतेय.. आणि ममतेची ऊब मिळविण्यासाठी ती चातका प्रमाणं वाट बघतेय.. मात्र सारा दिवसरात्र शून्यात जात असतांना हा हृदयाचा थरकाप उडविणारा क्षण ..आता मानवी मनाची काहिली माजवतोय.

मानव असो की जनावर ममतेचं कवित्व सर्वांना लागूं असते.पाळीव प्राणी, पाळीव पक्षी यावर मानवी प्रेम अलगदपणे होतंय या भावना प्रकट करण्याची गरज नसते.गाय आणि वासरू हे निर्वाज्य प्रेमाचे प्रतिक मानले जातात.गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असते.तसेच वत्साचे गायींवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते.यालाच एक अपवाद ठरलाय आणि असाच एक क्षण मानवी मनाची पुरती काहिली माजवतोय आहे मारेगाव तालुक्यातील पिसगावात.

ती दुधाळ गाय. अवघ्या अठ्ठावीस दिवसांपूर्वी तिने धवल रंगाच्या कालवडीला जन्म दिला.आपल्या लेकरासाठी रानावनात कोसो दूर असली तरी ती लेकरांसाठी सांजवेळी गोठ्यात येते यातूनच भावनेची किनार अलगद स्पष्ट होते.

मात्र त्या गायीचा शिवारात चरत असतांना पोलिसात गेलेल्या तक्रारीवरून विद्युत तारेच्या स्पर्शाने ऐन काही दिवसांपूर्वी क्षणात मृत्यू होते.त्या गायीचं कालवड मात्र आई विना मानवी मनाची काहिली माजवित आहे.किंबहुना नियमित तिचा हंबरडा पिडीत शेतकऱ्यासह आजूबाजूला भावनेची साद घालण्यात मनाची कालवाकालव करते आहे.ह्या हृदयद्रावक क्षणाने बघणाऱ्यांच्या मनाची चिडफार करीत आहे.ममतेच्या दूधा पासून कायम मुक्ती मिळालेल्या कालवडीच्या हंबरड्याला शमविण्यासाठी शेतकरी पाचभाई दाम्पत्य पराकाष्ठा करीत आहे.मात्र मातृत्वाची अभागी जागा कोणीच घेऊ शकत नसल्याने तिच्या हंबरड्याने सर्वच कासावीस होते आहे.

मुक्या जनावरांची भावना अन गुन्हे
कालवडीच्या आईचा विद्युत स्पर्शाने मृत्यू झाल्याने गाय व शेतमालकात घटनास्थळावर किंचित शाब्दिक चकमक झाली आणि पिडीत अल्पभूधारक शेतकऱ्याने पोलिसात तक्रार केली.पोलीस पंचनामा , पशुसंवर्धन विभागाचे शवविच्छेदन हे सोपस्कार पार पडले आणि नुकसानीला जबाबदार असलेल्या तक्रारीवरून मारोती गौरकार यांचेवर गुन्हे दाखल झाले किंबहुना तब्बल दोन दिवसांनी शेतकरी महिलेने पोलिसात तक्रार देत पिडीत शेतकऱ्यावरही गुन्हे दाखल झाले.

विशेष म्हणजे एकीकडे मुकं जनावर मातेसाठी हंबरडा फोडत असतांना इवल्याशा कालवडीच्या ममत्वेची जाणीव कोणी करायची की एकमेकांची जिरवायची ? हा खरा प्रश्न आहे.मुक्या मनाची भावना कोणी समजून घ्यावी ?अलीकडेच रोज सकाळ संध्याकाळी तिचा हंबरडा मात्र मनाची काहिली माजवत असतांना यातून तरी बोध घेण्याची नितांत गरज आता मानवाला होणे गरजेचे झाले आहे.एवढे मात्र निश्चित !

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment