Breaking News

बेंबळा कॅनल फुटल्याने शेतीला भगदाड

-शेताची दुरुस्ती करून देण्याची पिडीत शेतकऱ्याची मागणी

-मारेगाव तालुक्यातील बोरी गदाची येथील घटना

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

तालुक्यातील बोरी (गदाजी) शिवारात हुसेन रामा करडे यांच्या नावे शेत गट न 44 नुसार 1 हेक्टर 6 आर एवढी शेतजमिन आहे.मागील वर्षी म्हणजे 2022 च्या जुलै ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बेंबळा कॅनल पूर्ण भरला होता. यामध्ये शेता शेजारील बेंबळा कॅनल फुटून या कॅनलचे पाणी करडे यांच्या शेतात शिरल्याने शेतात अंदाजे अर्धा एकरचा अंदाचे 12 फूट खोल गड्डा पडला आहे.यात हुसेन करडे यांच्या शेताचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतात पिकवलेला शेतमाल यात नष्ट झाला.चक्क शेतातच भगदाड पडल्यामुळे भविष्यात या जमिनीवर शेती करणे अशक्य झाले आहे. या नुकसाणीसाठी बेंबळा विभाग जबाबदार असून त्यांनी हुसेन करडे यांच्या शेताची माती आणि मुरूम टाकून दुरुस्ती करून द्यावी अशी पिडीत शेतकऱ्यांची मागणी आहे.

पिडीत शेतकऱ्याने 13 डिसेंबर 2022 रोजी सहाय्यक अभियंता बेंबळा कालवे विभाग क्रमांक 3 यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले असता त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही.त्यानंतर पुन्हा 2 मार्च 2023 रोजी सहायक अभियंता बेंबळा कालवे विभाग यवतमाळ यांना भेटून निवेदन दिले असता आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही.दोन वेळा हुसेन करडे यांनी बेंबळा कालवे विभाग यवतमाळ यांना निवेदन दिले परंतु शासनाने हुसेन करडे यांच्या शेताची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करून दिली नाही त्यामुळे संबंधित शेतकरी हताश झाला आहे.

शेताची लवकरात लवकर म्हणजे शेती हंगाम सुरू होण्यापूर्वी योग्य दुरुस्ती करून दिली नाही तर संबंधित विभागाच्या विरोधात उपोषणाचे माध्यमातून आंदोलन आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment