Breaking News

सिनेस्टाईल थरार अपडेट.. गुन्ह्याची कबुली : आरोपींची आदीलाबाद कारागृहात रवानगी

– बंगाली डॉक्टर लूटमार प्रकरण

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मागील 13 मार्च रोजी मारेगाव स्थित नवरगावच्या बंगाली डॉक्टरला दोन तासाच्या सिनेस्टाईल लूटमार प्रकरणातील परराज्यातील आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली.मात्र लुटीतील रोख रक्कम , सोन्याची अंगठी व चैन व वापरलेली कार जप्त करण्यात अजून यश आले नाही.किंबहुना मारेगाव पोलीस स्टेशनचा पिसीआर संपून शनिवारला आरोपींची आदीलाबाद कारागृहात रवानगी करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथे क्लिनिक असलेल्या डॉ.पोभासा हाजरा यांना मागील 13 मार्च रोजी सायंकाळी मारेगावकडे परतत असतांना आंतरराज्यातील टोळीतील चौघांनी रिव्हॉल्व्हर व चाकूचा धाक दाखवित रोख रकमेसह सोन्याची अंगठी व चैन सिनेस्टाईल स्वीप्ट कार ने पोबारा केला होता.या घटनेने मारेगाव तालुक्यात पुरती खळबळ माजली होती.

आरोपीकडून दुसऱ्याच दिवशी दुसरी लूट

मारेगाव लूटमार प्रकरण तपासाचे चक्र जलदगतीने फिरत असतांना आरोपींनी दुसऱ्याच दिवशी तेलंगणा राज्यात कंटेनरची लूट केली.आरोपींनी या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हुंडाई कंपनीची कार वापरली होती.

दरम्यान , कंटेनर लूटमार प्रकरणात इचोडा जिल्हा आदीलाबाद पोलिसांच्या जाळ्यात हे आरोपी अलगद अडकले.

तपास मारेगाव वर केंद्रीत

इचोडा पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्यातील टोळीचे धागेदोरे मारेगाव प्रकरणाशी जुळते काय ? यावरून प्रशासकीय यंत्रणांनी वेगवान घडामोडीत हे आरोपी मारेगाव पो.स्टे. स्वाधीन करण्याच्या हालचालीला वेग आणला आणि 25 मार्च रोजी आरोपींना मारेगावात आणून सात दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यात आली.

मारेगाव चा गुन्हा कबूल पण मुद्देमाल नाही

परिणामी , मारेगावात आणलेल्या आरोपीत मो.अर्षद अब्दुल्ला (31) रा.जिराहिरा ता. पहारी जिल्हा भरतपूर (राजस्थान) तर जाकीर खान हासनी (30) , मुजाहिर खान इंद्रिस (26) , मुश्ताक खान प्रताप (34) हे तिघे राहणार हातीया ता. छाता जिल्हा मथुरा (उत्तरप्रदेश) यांचा समावेश असतांना त्यांनी मारेगाव लूटमार प्रकरणाचा गुन्हा मागील बुधवारला कबूल केला मात्र तूर्तास मुद्देमाल हस्तगत झाला नाही.मात्र इचोड पोलिसांनी आरोपींकडून 2 रिव्हॉल्व्हर , 1 चाकू , 14 काडतुस , 2 देशी कट्टे जप्त केले.

परप्रांतातून आलेले या आरोपींवर इतरही राज्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.ते आंतरराज्यातील टोळीतील हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांना लूटमार करण्यासाठी स्कुटीवरून येणाराच का दिसला असावा ? हा प्रश्न मात्र मारेगाव तालुकावासीयांच्या मनात घिरट्या घालत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment