– पाठलाग करतांना एकाने दाखविली रिव्हॉल्व्हर दुसरा पोलिसांच्या ताब्यात
-खैरी – चिंचमंडळ रस्त्यावरील थराराने प्रचंड खळबळ
मारेगाव : दीपक डोहणे
अलीकडेच क्राईमचे प्रमाण दिवसागणिक वाढत असतांना भर दुपारी एका महिलेची पर्स लुटून पोबारा करणाऱ्या व त्यांचा पाठलाग करणाऱ्या एका संशायिताने थेट रिव्हॉल्व्हर दाखविली तर दुसऱ्यास पकडण्यास खैरीच्या युवकांना यश आले.ही धक्कादायक घटना आज सोमवारला दुपारी १२ वाजताचे दरम्यान चिंचमंडळ खैरी मार्गावर घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील एक दाम्पत्य मार्डी कडे येण्यासाठी खैरी बस थांबा नजीक उभे होते.यादरम्यान काही वेळातच दुचाकी घेऊन आलेल्या दोघांनी महिलेची पर्स हिसकावून पलायन केले.लागलीच ओम भोरे व युवकांनी मोटारसायकलने पाठलाग केला.अशातच धानोरा शिवारात चोरट्यांचा गाडीचे पेट्रोल संपल्याने दुचाकी सोडुन शिवारात पळ काढण्याचा प्रयत्न झाला.
मात्र खैरी येथील युवकांनी त्या संशायितांना पकडण्यासाठी मागे धावू लागले.या थरार प्रसंगात एकाने चक्क रिव्हॉल्व्हर काढले आणि युवकांच्या दिशेने ते रिव्हॉल्व्हर दाखवित पोबारा केला.मात्र दोघांपैकी एका जवळ कोणतेही शस्त्र नसल्याने खैरी युवकांना एकास पकडण्यात यश मिळविले.संतोष खिरटकर (40) वरोरा जिल्हा चंद्रपूर असे या चोरट्याचे नाव असल्याचे कळते. त्यास वडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.