Breaking News

ब्रेकींग.. मारेगावात घरफोडी : 50 हजाराच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ओम नगरी तील घटना

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

शहरातील ओम नगरी (प्रभाग क्रमांक 5 )येथील चोरट्यांनी दोन घरे फोडून एका घरातील रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना सोमवार ला पहाटेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.या घटनेने मारेगावात भितीचे वातावरण पसरले आहे.
मारेगाव येथील ओम नगरीत अनिल डाखरे यांचे मुख्य घराचा दरवाजा बाहेरून लावत बाजूच्या खोलीतून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला.पती , पत्नी व दोन मुले गाढ झोपेत असतांना चोरपावलांनी चोरट्यांनी बेडरूम मध्ये महिला पाहुणीही साखरझोपेत असतांना प्रवेश केला.
बेडरूमध्ये एका कोपऱ्यात पेटी ठेवलेली होती.चोरट्यांनी ही पेटी घेऊनच पोबारा केला. यात असलेले किमान 30 हजार रुपये रोख , सोन्याची एकदानी व कानातील डुल असे 25 हजार रुपयांच्या आभूषणावर चोरट्यांनी डल्ला मारला.
या चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारी असलेल्या लोहे यांचे घराकडे वळविला.यांचेकडे भाड्याने असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक रामेश्वर राऊत यांचे खोलीचा ताला फोडून आत गेले. मात्र खोलीत कागदपत्रांशिवाय काहीच चोरट्यांचा हाती लागले नाही.सदर शिक्षक सुट्ट्या असल्याने शनिवारला मूळ गावी गेले होते. चोरट्यांनी चोरीत वापरलेले कटर व इतर साहित्य घराबाजूला असल्याचे निदर्शनास आले आहे.दरम्यान या घटनेने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील आठवड्यात चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी
ओम नगरीत मागील रविवारला एका सैनिकाच्या निवासी चोरट्यांनी ताला फोडण्याचा प्रयत्न केला.मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला होता.याबाबतची तक्रारही पोलिसात दाखल करण्यात आली होती.तपासात सैलपणा आल्याने चोरट्यांनी या रविवारी दोन घरे रडारवर ठेवत चोरीचा प्रयत्न यशस्वी केला.तूर्तास उन्हाळा असल्याने रात्रपाळीत पोलिसांची गस्ती वाढविणे आता अनिवार्य झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment