Breaking News

नारीशक्तीचा अवैध दारूविक्री विरोधात एल्गार

– वनोजादेवी : मारेगाव पोलिसात सरसावल्या

मार्डी – केशव रिंगोले

तालुक्यातील वनोजा देवी परिसरात मागील अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. वारंवार तक्रार करूनही विक्री चालू असल्याने देवीच्या दर्शना साठी येणाऱ्या भाविकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

या अवैध व्यवसायाने परिसरातील तरुण नशेच्या आहारी जाऊन त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. कुटुंबा मधे कलह निर्माण होत आहे. नव्हे तर परिसरातील सामाजिक सलोख्याला प्रचंड बाधा निर्माण होत आहे.

विदर्भातील प्रसिद्ध असे जनामाय कासामाय मंदिर परिसरात हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्यामुळे वनोजा देवी गावातील महीला पोलीस स्टेशन वर धडकल्या.

परिसरात दारू विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन व तहसीलदार दीपक पुंडे यांना देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यकारिणीनी अवैध दारू विक्री विरोधात ठराव पारीत केला. निवेदन देण्यासाठी सरपंच डीमनताई टोंगे, उपसरपंच प्रशांत भंडारी यांच्या नेतृत्वाखाली वनिता ढोके,सुषमा ढोके, अमृता ढोके, सिंधू सोनटक्के, चंद्रकला राजूरकर, सीमा शिंदे, प्रियंका बोढे, इंदिरा बरडे, विमल सातपुते, जोत्सणा आस्वले, गिरिजा राजूरकर, मनीषा राजूरकर, कुंता मोतेकर, परवीन शेख, सुनंदा राजूरकर, प्रशांत बोढे, गोवर्धन टोंगे आदीच्या उपस्थितीत देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन दारू विक्री बंद करण्यात आली नाही तर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मागू अथवा उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा गर्भित ईशारा नारीशक्तींनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment