– बंगाली डॉ.हाजरा लूटमार प्रकरण
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव स्थित डॉ.हाजरा यांना रिव्हॉल्व्हर व चाकूचा धाक दाखवून सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लुटून पोबारा करणाऱ्या चार संशायित आरोपींना तेलंगणा राज्यातील पोलीस ठाण्यातून ताब्यात घेत मारेगाव ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान , या लूटमार प्रकरणानंतर काही लुटारूंनी तेलंगणा राज्यातही कंटेनरची चोरी केली होती. यात तब्बल सात संशायित आरोपींना इचोडा जिल्हा आदीलाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मारेगाव – वणी पोलिसांसह यवतमाळ एलसीबी पथकांनी तपासाची चक्रे गतिमान केल्यानंतर तेलंगणा राज्यात संशायितांचा सुगावा लागला.इचोडा पोलीस स्टेशन प्रकरणाचा धागा पकडत मारेगाव पोलिसांनी संशय व्यक्त करीत पिसीआर संपल्यागत सात पैकी चार संशायितांना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेत मारेगाव ठाण्यात आज सकाळी ११.३० वाजता आणण्यात आले.
दरम्यान , मारेगाव पोलिसांनी फिर्यादी यास तेलंगणात नेऊन आरोपींची ओळख पटविण्याची रंगीत तालीम करण्यात आली होती.इचोड पोलिसात संशायितांनी मारेगाव प्रकरणाचा गुन्हाही कबूल केला नसल्याचे सांगण्यात येत आहे.किंबहुना संशायितांच्या घटनेच्या दिवसाचा मारेगाव मोबाईल लोकेशन खरा आधारच हे प्रकरण सैल होणार असल्याचे मानले जात आहे.
संशायित आरोपीस आता मारेगाव पोलिसांच्या बाजीराव च्या पट्ट्याने या गंभीर प्रकरणाची नेमकी कशी उकल होते याकडे सर्वांचे नजरा खिळल्या आहे.