– मारेगाव तालुक्यातील सालेभट्टीत शोककळा
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
सालेभट्टी ग्रामपंचायत प्रशासनाचे काम आटोपून जेसीबी मारेगावकडे येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकल स्वारास जेसीबीने जबर धडक देत सालेभट्टी येथील युवकाचा करून अंत झाल्याची हृदयद्रावक घटना आज गुरुवार संध्याकाळी ७.३० वाजता घडली.
जेसीबी अपघातात मृत पावलेल्या शिवम नामदेव आत्राम (२१) असे युवकाचे नाव आहे.
शिवम हा घरगुती कामानिमित्त मारेगाव येथे आला होता.सायंकाळी स्वगावी सालेभट्टी येथे दुचाकीने जात असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबी मशीनने मांगरूळ सालेभट्टी रस्त्यालगत जबर धडक दिली.यात शिवम हा जागीच गतप्राण झाला.
दरम्यान , सालेभट्टी येथील ग्रा.पं. च्या कामानिमित्त जेसीबी ही कार्यरत होती.सदर काम हे वणी येथील कंत्राटदार तर जेसीबी ही मारेगाव येथील असल्याचे कळते.दरम्यान शिवम हा होतकरू होता.त्याच्या पश्चात आई , वडील , भाऊ , बहिणी असा आप्तपरीवार आहे.याबाबतची तक्रार वृत्त लिहिपर्यंत झाली नव्हती.
सातत्याने कार्यरत असणाऱ्या शिवमच्या अकाली अपघातानाने सालेभट्टी येथे शोककळा पसरली आहे.