– संशायित दोघेही विधी संघर्ष मुले
– मारेगाव तालुक्यातील घटना
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुका पुन्हा कासावीस झाला.तालुक्यातील एका गावातील अंगणवाडीत शिकणाऱ्या दोन कोवळ्या कळ्यांना कुस्करून टाकण्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
मारेगाव पासून पूर्वेकडे ७ कि.मी. अंतरावर असलेल्या गावातील अंगणवाडीत ज्ञानार्जन करणाऱ्या दोन सहा वर्षीय मुली घराच्या छतावर खेळत होत्या.
या कोवळ्या कळ्यांवर दोन 14 वर्षीय विद्यार्थ्यांची काळीमा फासणारी करडी नजर पडली. तुम्हाला खेळण्यास फुलपाखरू पकडून देतो म्हणत गावातीलच एका झोपडीत नेऊन कुकर्म केले. १९ मार्च रोजी घडलेल्या घटनेत कोवळ्या कळींना असह्य वेदना होऊ लागल्या.
अशातच आईंनी विचारपूस केल्यानंतर घडलेल्या प्रसंगाची आपबिती कथन करताच आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली.संतापजनक प्रसंग अन घटनेची फिर्याद दोघींच्या आईवडिलांनी मारेगाव पोलिसात दाखल केली.
फिर्यादीवरून 13 व 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थी असलेल्या दोन विधी संघर्ष मुलांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी प्रक्रिया अंती काळीमा फासणाऱ्या संशायितांची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे.