Breaking News

आत्महत्येची धग.. गुढीपाडव्याच्या दिवसाला शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट

– मारेगाव तालुक्यातील चोपण येथील घटना

मार्डी – केशव रिंगोले

गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा दिवस सर्वत्र साजरा होत असतांना मारेगाव तालुक्यातील चोपण येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना २२ मार्च रोजी घडली.अत्यल्प शेतातील उत्पादन व कर्ज असल्याची किनार या आत्महत्येला जोडली जात आहे.

सर्वत्र गुढीपाडवा साजरा करण्यात येत असतांना मारेगाव तालुक्यातील चोपण येथील यूवा अल्पभूधारक शेतकरी प्रवीण महादेव खिरटकर (36) हे नेहमीप्रमाणे सकाळी पशुधनास वैरण घालण्यास शेतात गेला होता.पशुधनाची व्यवस्था करून शेतातील गोठ्यात असलेले कीटकनाशक प्राशन केले.

दरम्यान , शेजारील शेतकरी प्रवीणच्या गोठ्याकडे गेला असता त्यांना प्रवीण निपचित पडलेला दिसला. ही बाब प्रवीणच्या घरी भ्रमनध्वनी वरून सांगितल्यानंतर लगेच मारेगाव रुग्णालयात हलविले.यावेळी प्रविणच्या शेजारी त्यांना कीटकनाशक द्रव्याचा डबा पडलेला दिसला.

प्रविण यास पुढील उपचारार्थ वणी येथे हलविले. मात्र उपचारादरम्यान वणी येथे त्यांचा मृत्यू झाला.परिणामी प्रवीण हा अविवाहित होता.त्याच्या पश्चात आई ,वडील व एक भाऊ आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment