विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
गुढीपाडवा सण साजरा करून चंद्रपूर येथून परतत असलेल्या डॉक्टर दाम्पत्याच्या कारला वरोरा नजिक भीषण अपघातात डॉक्टर पत्नी जागीच ठार झाल्या. गंभीर जखमी झालेल्या पती डॉक्टरचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वणी मारेगाव वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ.अश्विन गौरकार (झाडे)(३२) यांचे माहेर असलेल्या चंद्रपुर येथून डॉक्टर दाम्पत्य कार ने वणीकडे परतत असतांना विरुद्ध दिशेने आलेल्या टिप्परने कारला जबर धडक देत कारला फरफटत नेले.
या भीषण अपघातात मारेगाव येथे खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉ.अश्विनी गौरकार (झाडे) यांचा जागीच मृत्यू झाला.पती डॉ. अतुल गौरकार हे गंभीर जखमी झाले होते.मात्र वरोरा येथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.डॉ.अतुल हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.
मृतक डॉ अश्विनी गौरकर (झाडे)
मृत डाँक्टर दाम्पत्याच्या मागे कोवळा मुलगा असून या दुर्देवी घटनेने वणी मारेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत वैद्यकीय क्षेत्रात पुरती शोककळा पसरली आहे.