Breaking News

मारेगावच्या स्त्री रोग तज्ञ महिला डॉक्टर ठार

वणी – वरोरा रोडवरील घटना : पती गंभीर जखमी

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मारेगाव शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ असलेल्या महिला डॉक्टर यांचा आज २२ मार्च अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वरोरा वणी रोडवर घडली. तर डॉक्टर पतीची प्रकृती गंभीर आहे.

अपघात इतका भीषण होता की टिप्परने दांपत्याच्या

गाडीला शंभर फूट पर्यंत ओढत नेले.

मारेगाव शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ अश्विनी गौरकार (झाडे) व त्यांचे पती डॉक्टर अतुल गौरकार हे त्यांच्या गाडी क्रमांक एम एच 34 एएम 42 40 ने खाजगी कामाकरिता नागपूरला जात होते.

दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा टिप्परने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती ती दांपत्याच्या कारला शंभर फूट पर्यंत खेचत नेले. वरोरा जवळ असलेल्या शेंबड गावाजवळ दुपारी साडेतीन-चार दरम्यान सदर अपघात घडला. यात महिला डॉक्टर जागीच गतप्राण झाल्या तर डॉक्टर पतीच्या हाताला डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे नागरिकांनी तात्काळ वरोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment