Breaking News

सालगड्याची गुढी दीड लाखाच्या उंचीवर..!

– सालगड्याचे भाव यंदाही वधारले

– शेती करणे झाले अवघड

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्व व्यवहार शेतीवरच अवलंबून असल्याने शेतमालक हे आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेतीच्या कामासाठी नवीन सालगडी ठेवण्याची लगबगीत आहे.

सध्या च्या काळात शेतीमध्ये काम करण्यासाठी अनेक जण तयार नाहीत शिवाय सालगड्याची साल दरवर्षी वाढत चालले असून यावर्षी आणखी दहा ते पंधरा हजाराची वाढ होताना दिसत असल्याने शेतकऱ्यासमोर विशेषता मोठ्या व मध्यमवर्गीय शेतकऱ्यासमोर साल गड्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. साल गड्याचे पॅकेज एक लाख ४० ते ५० हजार रुपयाच्या घरात पोहचले आहे.

सालगड्यास ठरलेल्या साला व्यतिरिक्त धान्य ,काही वस्तू देण्याची जुनी परंपरा आहे. पण वाढती महागाई च्या तुलनेत शिक्षण कर्तव्य यामुळे ठराविक मजुरीत खर्च भागत नसल्याने सध्याच्या काळात शेतीमध्ये काम करण्यासाठी अनेक जन तयार नाहीत. यामुळे तसेच अनेक बाबीमुळे शेती तोट्यात जात असल्याने अनेक शेतकरी सालगडी ठेवण्यास धजावत नाही.

अशा वेगवेगळ्या कारणाने भविष्यात शेतीतील सालगडी ही परंपरा संपुष्टात आल्यास शेती व्यवसाय अडचणी करणे कठीण होणार असल्याचे मत जुने जाणते अनुभवी शेतकरी व्यक्त करीत आहे. तरीपण मोठे व मध्यम आणि ज्यांच्याकडे फळबाग पशुपालन बागायती क्षेत्र जास्त आहे.अशा शेतकऱ्यांना सालगडी ठेवल्याशिवाय पर्याय नसल्याने ते सालगडाच्या शोधात असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.

शेतकरी अडचणी
दरवर्षी सालगड्याची मजुरी वाढत चालली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त यावर्षी दहा ते पंधरा हजाराची वाढ झाली. दरवर्षी जर अशीच वाढ होत गेली तर एक दिवस मोठ्या व मध्यम शेतकऱ्याला शेती करणे अवघड होऊन बसणार आहे अगोदरच शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.

त्यात ओल्या दुष्काळामुळे सोयाबीन च्या पिकात तसेच हरभऱ्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यात खाजगी बाजार पेठेमध्ये शेतमालाचे भाव पडल्यामुळे येणारा कार्ड शेती करिता कठीण होत चाललेला दिसतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment