Breaking News

भाकपचे आंदोलन… मारेगावात बसस्थानकासाठी रास्ता रोको

– नियोजित जागेवर एसटी चे प्रात्यक्षिक
– एक तास दुतर्फा वाहतूक प्रभावित
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मागील अनेक वर्षांपासून मारेगाव बसस्थानकाचा विषय अधांतरी असल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करून प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करा व बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावा या प्रमुख मागणीसाठी मारेगाव तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी मोर्चेकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नियोजित जागेवर एस.टी. पाठवून यापुढे येथेच बस थांबली पाहिजे अशी आग्रही मागणी केली.
मार्डी चौकातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव अनिल घाटे , सहसचिव बंडू गोल्लर , तालुका सचिव लता रामटेके , सहसचिव पुंडलीकराव ढुमणे यांनी केले.
मोर्चेकऱ्यांनी बसस्थानकाचा रेंगाळत असलेल्या प्रश्नावर घोषणा देत नियोजित बसस्थानक जागे समोरील राज्यमहामार्गावर रास्तारोको करण्यात आला.किमान एक तास चाललेल्या आंदोलनात आक्रमक होत मोर्चेकऱ्यांनी बसस्थानक ची मागणी लावून धरली.यावेळी दुतर्फा वाहतुकीच्या दूरवर रांगा लागून प्रवासी प्रभावित झाले.या दरम्यान ठाणेदार राजेश पुरी यांच्या नेतृत्वात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    तीन महिन्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
आंदोलन सुरू असतांना आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार , यवतमाळ बसस्थानक आगार प्रमुख गावंडे व वणी आगार प्रमुख यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.यावेळी मोर्चेकरी आक्रमक होत यापुढे बस थांबा नियोजित जागेवरून करण्याची मागणी रेटून धरण्यात आली.मात्र तूर्तास बस जाऊ शकत नसल्याची प्रशासकीय भूमिका खोडून काढीत महिला तालुका सचिव लता रामटेके यांनी नियोजित जागेवर बस जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.
अखेर बस नियोजित जागेत पाठविण्यात आली आणि यापुढे येथेच बस थांबाचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.परिणामी प्रशासकीय स्तरावर बसस्थानकाचा प्रश्न अखेरच्या टप्प्यात असून कागदोपत्री कामकाज अवघ्या तीन महिन्यात पूर्णत्वास जाण्याचा मनोदय व्यक्त करण्यात येऊन तीन महिन्यात बसस्थानक बांधकामास प्रारंभ करण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकारी व आमदार महोदयांनी दिल्याने रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment