– शैक्षणिक क्षेत्रात शोककळा
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सालइपोड येथील जिल्हा परिषद शिक्षक अतुल आत्राम(४०) अल्पशा आजाराने निधन झाले.या वेदनादायी घटनेने शैक्षणिक क्षेत्रात पुरती शोककळा पसरली आहे.
मारेगाव तालुक्यातील मच्छीन्द्रा येथील मूळ गाव व येथील प्रभाग क्र. ५ मध्ये निवासी असलेले अतुल आत्राम यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत प्रशासकीय सेवेत भरारी मारली.नम्रता , सुशील अन शांत सुस्वभावी शिक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख अधोरेखित केली.गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांना मारेगाव येथे भोवळ आली आणि तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले.
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.मात्र नियतीच्या मनात वेगळंच असतांना अतुल सर यांचेवर काळाने आज मंगळवारला सकाळी सात वाजताचे दरम्यान झडप घातली.
अतुल आत्राम यांचे पश्चात आई , वडील , पत्नी , दोन कोवळी मुलं , बहीण , भाऊ असा आप्तपरीवार आहे.मच्छीन्द्रा स्थित आज दुपारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.