Breaking News

संवेदना.. तलाठी नविन सुरपाम यांचे निधन

– दीर्घ काळ होते मारेगावात वास्तव्य
– उमरी दवाखान्यात घेतला अखेरचा श्वास

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार पारख सुरपाम यांचे सुपुत्र नविन सुरपाम (तलाठी ) यांचे अल्पशा आजाराने आज सोमवार ला पहाटे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय (४३) होते.

मारेगाव येथील सुभाष नगर येथे सुरपाम कुटुंब वास्तव्यात होते.वडील पारख सुरपाम हे मारेगाव येथे नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झाले होते.मुलगा नविन याचे शिक्षणही मारेगाव येथे झाले. नविन याचा मित्रपरिवार व सवंगड्याचा जमघट मारेगावात मोठ्या प्रमाणात आहे.

कालांतराने त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेत नौकरी प्राप्त झाली.ही नौकरी सोडून तो तलाठी पदावर झरी जामनी येथे कार्यरत होता.तूर्तास पांढरकवडा येथे वास्तव्यात असतांना मागील काही दिवसांपासून प्रकृती साथ देत नव्हती.

दोन दिवसांपूर्वी नविन सुरपाम यास उमरी दवाखान्यात भरती करण्यात आले.आज सोमवारला पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतल्याने झरी – मारेगाव – पांढरकवडा मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.

मृतक नविन याच्या पश्चात आई , पत्नी व दोन मुली आहेत. आज दुपारी एक वाजता पांढरकवडा स्थित त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment