Breaking News

भाडे न दिल्याचा राग… हरभऱ्याच्या गंजीला लावली आग..!

लाखाचे नुकसान : गुन्हा दाखल
– मारेगाव तालुक्यातील वागदरा येथील घटना.

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

अँटोरिक्षा चे भाडे देत नसल्याने राग अनावर होत चालकाने चक्क शेतकऱ्याचा शेतातील हरभऱ्याच्या गंजीला आग लावून किमान एक लाख रुपयाचे नुकसान केल्याची घटना दि १९ मार्च चे रात्री २ वाजताच्या दरम्यान वाघदरा येथे घडली.

या घटनेच्या विरोधात फिर्यादीच्या तक्रारी वरून संशायित आरोपी संतोष नत्थु भोयर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश निळकंठ कावडे रा. वाघदरा यांनी या वर्षी खैरगाव शेत शिवारात भाड्याने केलेल्या तीन एकर शेतात चना पेरला होता.सध्या अकाली पावसाचे दिवस असल्याने सोंगवलेला हरभरा शेतात गंजी मारून ठेवला.

दरम्यान घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी संतोष नत्थु भोयर रा.वाघदरा याने फिर्यादी सोबत अँटोरिक्षा भाड्याचे तू पैसे का देत नाही म्हणून शाब्दीक बाचाबाची करीत तुझे कसे नुकसान करतो असा दम भरला. त्याच रात्रीला संशायित आरोपीने शेतातील हरभरा गंजीला आग लावून २० ते२५ क्विंटल चना जाळून खाक केला. यात किमान एक लाख रुपयाचे वर नुकसान झाल्याची तक्रार पिडीत शेतकरी योगेश कावडे यांनी पोलिसात दिली.

प्राप्त तक्रारी नुसार संशायित आरोपी संतोष भोयर याचे विरुध्द भादंवी ४३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment