Breaking News

आत्महत्येची धग…अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने घेतली विहीरीत उडी

मांगरुळ शिवारात सकाळी सालदारास तरंगत दिसला मृतदेह

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

नऊ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने तालुक्यातील मांगरूळ शिवारात असलेल्या विहिरीत उडी मारून जीवनयात्रेचा अखेर केल्याची घटना आज रविवारला सकाळी आठ वाजताचे उघडकीस आली.

प्रफुल्ल मोरेश्वर खडसे (३०) असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थाने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात प्रफुल्ल हा भरती होता.नऊ महिन्यापूर्वीच विवाहबद्ध झालेल्या प्रफुल्ल सोबत त्याची पत्नी उपचारादरम्यान सोबत होती.

शनिवारी त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मूळ गावी मांगरुळ येथे गेले.आज सकाळी पहाटे पाच वाजता चे दरम्यान प्रफुल्ल हा राज्य महामार्गालगत असलेल्या एका शेतातील विहिरीत उडी घेतली.

दरम्यान , शेतमालक व सालदार शेतात आले असता सालदार पाणी आणण्यासाठी विहीरकडे गेले.पाणी काढत असतांना विहिरीत मृतदेह तरंगत दिसल्याने आत्महत्येची बाब उघडकीस आली.

परिणामी , प्रफुल्ल याने आत्महत्या का केली ? याबाबत अस्पष्टता आहे.मृतकाच्या पश्चात आई , पत्नी व दोन भावंड आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment