Breaking News

‘त्या’ गुन्हेगाराकडून मारेगावचा गुन्हा “नाकबूल”

तेलंगणात कंटेनरची चोरी
– मारेगाव हाजरा लूट प्रकरणाचे धागेदोरे गुलदस्त्यात

मारेगाव : दीपक डोहणे

मारेगाव (नवरगाव ) बंगाली डॉक्टर लूट प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तेलंगणा राज्यातील आदीलाबाद येथील कंटेनर चोरी प्रकरणात एकूण सात आरोपी अडकलेल्या व यातील चौघांनी मारेगाव लूटमार प्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा अजूनपर्यंत कबूल केला नसल्याने या गंभीर प्रकरणाचे प्रामुख्याने आरोपी मारेगाव पोलिसांना जेरबंद करण्याचे गूढ वाढले आहे.

मागील १३ मार्च रोजी बंगाली डॉक्टर यास सोन्याचा ऐवज व रोख रक्कम सिने स्टाईल लुटून लुटारूंनी मारेगाव – वणी येथून पोबारा केला होता.
गंभीर प्रकरण व सऱ्हाईत गुन्हेगार असल्याने स्थानिक पोलीस व यवतमाळ गुन्हे शाखेने पालथे घालत प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला.मात्र तब्बल सात चोरट्यांनी तेलंगणा राज्यात कंटेनरची चोरी करतांना एक जण तेलंगणा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.यातील सहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात तेलंगणा व एल.सी.बी.पथकाला यश आले. तूर्तास हे चोरटे तेलंगणा राज्यातील आदीलाबाद पोलिसांच्या कोठडीत आहे.
परिणामी , या चोरट्याचे मारेगाव कनेक्शन आहे काय याबाबत सखोल चौकशी करण्यात आली मात्र ठोस पर्याय निघाला नसल्याचे मारेगाव पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळे डॉ.हाजरा प्रकरणातील आरोपीचें गूढ अजूनही गुलदस्त्यात आहे.

दरम्यान , तेलंगणात अटकेत असलेल्या चोरट्यांना न्यायालयीन निर्देशाने मारेगाव पोलिसात वर्ग करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे.संशायित म्हणून त्यांना प्रसाद देऊनच प्रकरणाची उकल करण्याचा मारेगाव पोलीस प्रयत्न करणार आहे.मारेगाव येथे आणल्यानंतरच खऱ्या प्रकरणाचा छडा लागेल अशी संभाव्य शक्यता आहे.सदर आरोपी हे उत्तरप्रदेश , हरियाणा , तेलंगणा येथील असल्याची विश्वसनीय माहिती ‘विटा’ ला प्राप्त झाली आहे.

पावणे चार लाख रुपये लुट प्रकरण तूर्तास वेगळ्या वळणावर असले तरी तेलंगणात आरोपी अटकेत असतांना मारेगाव प्रकरणावर त्यांची तूर्तास नकारघंटा आहे.त्यामुळे या लूटमार प्रकरणाचे रहस्य गडद होत आहे.या आरोपींना मारेगावात वर्ग केल्यानंतर लूटमार प्रकरणाची सैलता जनतेच्या दृष्ठीपथात येणार आहे. या प्रकरणाचे गूढ आजतागायत कायम असले तरी मारेगाव पोलीस या प्रकरणी माध्यम प्रतिनिधीशी बोलण्यास कचरत व अस्पष्टता दाखवित आहे.

आरोपी आणल्यानंतरच प्रकरणाची उकल शक्य
तेलंगणा राज्यात चोरी प्रकरणात अडकलेल्या चोरट्यांची मारेगाव चोरी प्रकरणात नाळ जुळते काय ? हा प्रश्न अजूनपर्यंत अधांतरी असला तरी तपासाचा भाग म्हणून आम्ही न्यायालया मार्फत या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहो.मारेगावात आणल्यागत तालुक्यात घडलेल्या चोरी प्रकरणाचा छडा लागेल असा आमचा विश्वास आहे.लूटमार प्रकरणाच्या मुळाशी जावून पडदा पाडू एवढे मात्र निश्चित.

श्री.राजेश पुरी
ठाणेदार , पोलीस स्टेशन – मारेगाव

.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment