Breaking News

धनादेश अनादर प्रकरणी आठ महिन्याची शिक्षा

 – मारेगाव न्यायालयाचा निकाल

मारेगाव- विटा न्यूज नेटवर्क

आरोपीने फिर्यादीचे तीन लाख पंचेवीस हजार रुपये न देता त्याने फिर्यादीस दिलेला चेक अनादरित झाला.  या प्रकरणी मारेगाव न्यायालयाने आरोपीस पावणे चार लाख रुपये दंड व आठ महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

मारेगावचे हरिओम मोहन सिडाणा यांने फिर्यादी तुषार बोंकिंनपेल्लीवार कडून तीन लाख पंचेविस हजार रुपये हातउसने घेतले होते.त्याऐवजात आरोपीने फिर्यादिस एक धनादेश दिला. सदर धनादेश अनादरित झाल्याने त्याने मारेगाव न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजू तपासून आरोपी हरिओम यास मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश प्रभाकर वासाडे यांनी पावणेचार लाख रुपये दंड व आठ महिन्याची शिक्षा ठोठावली. 

फिर्यादी तुषार तर्फे एड. परवेज पठाण यांनी बाजु मांडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment