– पावने चार लाख लूट प्रकरण
– अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांची भेट
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील नवरगाव येथील बंगाली डॉक्टरच्या डोक्याला बंदूक व पोटाला चाकू लावत रोख व सोन्याचे ऐवज असा एकूण चार लाख रु.चे लुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे गवसण्यासाठी मारेगाव- वणी पोलीस पथक चहू बाजुंनी पालथे घालत आहे. या गंभीर घटनेकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.
डॉ.हाजरा हे आपली खासगी प्रॅक्टिस आटोपून मारेगाव कडे येत असतांना राज्य महामार्गावर कार ने आलेल्या चार युवकांनी बंदूक अन चाकूचा धाक दाखवित सोन्याचे ऐवज सह रोख रक्कम लुटून नेल्याने मारेगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान , या गंभीर प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी वणी मारेगाव पोलीस पथक आदीलाबाद , नागपूर , चंद्रपूर , वर्धा येथे रवाना झाले आहे.सदर प्रकरणी वेगवेगळ्या चर्चेलाही उधाण येत आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ अतिरिक्त पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी मारेगाव पोलीस पोलीसात भेट देत सूत्र हलविण्याच्या सूचना करीत प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. पोलीस प्रशासन आरोपींचा कसून शोध घेत असला तरी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकताच वास्तवतेचा उलगडा होणार आहे.