◆ मार्डी येथे ध.कुणबी मेळावा
मार्डी : केशव रिंगोले
आपापसातील हेवे दावे विसरून समाजाच्या प्रगतीसाठी, संपूर्ण समाजाची एकता आवश्यक असल्याचे प्रतिपादन खा. बाळूभाऊ धानोरकर यांनी केले .
ते मार्डी येथे संपन्न झालेल्या धनोजे कुणबी समाज प्रबोधन
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी खा.धानोरकर यांनी मार्डी त.मारेगाव येथील समाज भवणासाठी 51 लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विश्र्वास नांदेकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष कुळसंगे, रंगनाथ स्वामी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे, माजी जिल्हा परिषद सभापती अरूणाताई खंडाळकर, मारेगांवचे नगराध्यक्ष मनिष मस्की, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय आवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती वसंतराव आसुटकर, मार्डीचे सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, अशोक धोबे , रवींद्र धानोरकर, गजानन खापणे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
धनोजे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था मार्डीच्या वतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुभाष पिंपलशेंडे, किशोर सुर,मनीषा नागपुरे, डिमनताई टोंगे, चंद्रशेखर आवारी, मोहन जोगी, गंगाधर ठावरी, सुनिल सोमटकर, यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक विजय अवतडे यांनी केले. तर सूत्रसंचालन दिलीप डाखरे यांनी केले.