Breaking News

चिंचमंडळ येथे दोन कुटूंबात प्रचंड राडा

◆ लाठ्या काठ्याने बेदम मारहाण

◆ दोन महिलांसह एक इसम गंभीर जखमी

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

प्रेम आंधळं असतं.. प्रेमाला उपमा ही नसते..अलीकडच्या हायटेक जमान्यात कुणाचा जीव कुणावर लागेल..याबाबत न बोललेले बरे ! असाच प्रकार मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे घडून कुटुंबाची वाताहत होऊन प्रचंड राडा झाल्याची घटना बुधवार ला रात्री घडली.

ती २९ वर्षाची विवाहित महिला.तिला पती अन दोन मुली.असा कुटुंबाचा काफीला असतांना तिचा येथीलच एका युवकावर जीव जडला.कालांतराने दोघेही प्रेमाच्या सागरात आकंठ बुडाले. नव्हे तर ती पती अन दोन मुली सोडून व तो या प्रेमयुगुलाने गावातून पलायन केले.

प्रेम बहरत असतांना या युगुलांनी वेगळ्या तालुक्यात संसार थाटला.किमान वर्ष लोटल्यानंतर हे प्रेमयुगुल परत चिंचमंडळ या मूळ गावी परतले.त्याच्या आई वडिलांकडे त्यांच्या प्रेमाचा संसार सुरू झाला.

छोट्याश्या गावी एकमेकांची नजर तिच्या व त्याच्या गणगोतांना अस्वस्थ करीत असतांना बुधवारला संतापाची परिसीमा राडात उतरली.दोन्ही कुटुंबातील नातेवाईक एकमेकांसमोर भिडले.एवढेच काय तर संताप विकोपाला जात लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत यात दोन महिला सह एक इसम गंभीर जखमी झाला.एका महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

परिणामी, चंद्रशेखर शेडमाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुभाष सोयाम यांचेवर 324,504,506 तर विद्या सुनील शेडमाके हिने दिलेल्या तक्रारीवरून चंद्रशेखर हुसेन शेडमाके , राजू राजाराम कोडापे , कल्पना राजू कोडापे , शंकर उत्तम तोडासे सर रा.चिंचमंडळ यांचेवर 324, 323, 294, 504, 506, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment