◆ धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला चोरट्यांनी साधला डाव
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
धुलीवंदनाच्या करीच्या दिवसाला आपले इप्सित साध्य करीत अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठयात असलेल्या बकऱ्याला बळीचा बकरा बनवीत किमान १६ हजार रुपयांच्या किमतीचा बकऱ्यावर डल्ला मारल्याची घटना रविवारी मध्यरात्री मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथे घडली.
चेतन पारखी असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव असून त्यांच्या शेतातील गोठयात शेळी व कोंबडी बंदिस्त होते.गोठ्याला लावलेला ताला तोडून किमान १६ हजार रुपये किंमत असलेला बकरा अज्ञात चोरट्यांनी लांबविला.धुलीवंदनाच्या दिवसाचे औचित्य साधून चोरट्यांनी बकऱ्यावर हात साफ केला.मात्र अस्सल गावरान कोंबड्याकडे चोरट्यांनी सपशेल दुर्लक्ष केले.
या संदर्भातील पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.तूर्तास सदरील शेतकऱ्यास १६ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसत धुलीवंदनाचा रंग फिका केल्याने बकरा चोरट्यास गजाआड करण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.