Breaking News

पहापळ येथे भरला बालवैज्ञानिकांचा मेळावा

◆ जि.प.उ.प्रा.शाळेचा पुढाकार

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पहापळ येथे विज्ञान मेळावा २८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला.

सर्वप्रथम नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन यांच्या विषयी आणि इतर शास्त्रज्ञाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने भाषणातून प्रकाश टाकला.

शालेय विद्यार्थ्यांनी छोटे छोटे वैज्ञानिक मॉडेल या अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या अनुषंगाने सादर केले. प्रत्येक वैज्ञानिक मॉडेल ची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. प्रत्येक प्रयोगामागचे विज्ञान काय आहे ? असे घडण्यामागचा कार्यकारण भाव काय आहे तो जाणून घेतला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमोल गुरनुले यांनी सर्व मॉडेलचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पहापळ शाळेचे मुख्याध्यापक श्र एन. टी. चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पठवून दिले तथा विज्ञान शिक्षक श्री. संजय फुलबांधे सर यांनी वैज्ञानिक मॉडेल मधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. यासाठी पदवीधर शिक्षिका सौ. वाघमारे मॅडम आणि सहाय्यक शिक्षक श्री. अमर पुनवटकर सर यांचे सहकार्य लाभले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment