Breaking News

जत्रा से झकास वाका, ओ मामा, सागु जना जनलागे मामा ..!

◆ ग्रामीण भागाला आलेत जत्राचे वेध

कैलास ठेंगणे – मारेगाव

दोन वर्षानंतर पुन्हा एकदा जत्रा. जत्रा चा हंगाम सुरू झाला आहे. तालुक्यात नवरगाव ची जत्रा ऐन भरात आली आहे. तर त्या पाठोपाठ धुलीवंदनाला विदर्भातील प्रसिद्ध गोठमार यात्रा गदाजी (बोरी)येथे बहरणार आहे. त्यामुळे गोंडी भाषेतील, जत्रा से झकास वाका, ओ मामा सांगू जना जन लागे मामा.. हे लोकप्रिय गीत नागरिकांच्या तोंडी आपसुकस येतात. नागरीकांना आता कमालीचे जत्राचे वेध लागले आहेत.

तीळसंक्रांत होऊन काही दिवस लोटले आहेत .शेतशिवारात पिकाची काढणी जोरावर सुरू झाली. त्यासाठी शेतकरी शेतमजुराची लगबग चालू आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य मध्ये उत्साही वातावरणात वेध लागतात ते यात्रा वा जत्राचे.

मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथे तुळशी वृंदावन देवस्थान परिसरात यात्रा महोत्सव उत्साहात साजरा होत आहे .सदर यात्रा चार दिवस राहणार आहे. ही यात्रा अलोट गर्दीने फुलली आहे.या यात्रेनंतर विदर्भातील प्रसिद्ध गोटमार यात्रा धुलीवंदनाच्या दिवशी गदाजी (बोरी ) येथे भरणार आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गदाजी महाराजांचे जागृत मंदिर म्हणून संपूर्ण विदर्भात मंदिराची ख्याती आहे.

विदर्भातील विविध भागातून भाविक येथे दर्शन घेण्यास येतात.दरवर्षी मार्च महिन्यात धुलीवंदनाच्या दिवशी गोठमार यात्रेला प्रारंभ होते. यावर्षीही जत्रा ७ मार्च रोजी भरेल. सदर मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याचे भाविकाकडून सांगितल्या जाते.

आधुनिक युगात यात्रेचा आनंद आगळाच!
यात्रा करिता हजारो नागरिक हजेरी लावतात. सध्या सदा सर्वकाळ सर्वकाही मिळत असले तरी जत्रांमध्ये सजणाऱ्या छोटेखानी दुकानांमध्ये होणारी खरेदी आगळा आनंद देणारी असते. जत्रेनिमित्त रंगणारे फंड, लोककलावंताचे सादरीकरण हे सर्वच लोकांना आनंद देणारे म्हणूनच जत्राचे हे भारलंपण आधुनिक काळातही महत्त्व राखून आहे. मात्र जत्रेत हजारो नागरिक दिवस-रात्र येतात. त्यामुळे पोलिसावर ताण येणे हे सहाजिकच आहे .त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पोलिसांना सहकार्य केल्यास पोलिसांचीही कामे सुसह्य होऊ शकतात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मुलींची छेड काढाल तर दांडू का बसेल
यात्रेत मुलीचा पाठलाग करणे, मुलींची टिंगल टवाळी करणाऱ्यांची पोलिसांकडून दांडूक्याचा प्रसाद मिळू शकतो. अशा टवाळ टोळक्याकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे टवाळखोरांची खैर नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment