Breaking News

करणवाडीची सर्जा-राजाची जोडी ठरली अजिंक्य

◆ प्रेक्षकांच्या तोबा गर्दीत मानवी थव्याने झाडावर बसून चित्तथरारक प्रसंग साठवला डोळ्यात

मारेगाव : दीपक डोहणे

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण) येथे पहिल्यावहिल्या आयोजित शंकरपट थरारीत स्पर्धकासह प्रेक्षकांची तोबा गर्दी , स्पर्धेचे चित्तथरारक प्रसंगाने प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या बैलगाडा शर्यतीत आम जनरल मधून मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील युवा शेतकरी अक्षय ताजने यांच्या सर्जा-राजाच्या बैलजोडीने (६.४६)गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकवित मानाचा तुरा रोवला तर गावगाडा मधून वेगाव येथील श्री.संत जगन्नाथबाबा पुरस्कृत बैलजोडी (७.३६) गुण प्राप्त करीत अजिंक्य ठरली.

शेतकऱ्यांचा कौटुंबिक सदस्य समजला जाणारा बैल शर्यत अर्थात शंकरपट मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तुळसामाता देवस्थान द्वारा आयोजित यात्रा महोत्सवात शंकरपटाचा थरार चित्तथरारक ठरला. हजारो दर्दी प्रेक्षकांच्या तोबा गर्दीत चक्क सताड झालेल्या वृक्षावर मानवी थव्यांने हा शंकरपटाचा थरार डोळ्यात साठवित होते.शेकडो स्पर्धकांची एन्ट्री आणि हजारो प्रेक्षकांची गर्दीने नवरगावचा शंकरपट ऐतिहासिक ठरला.

दरम्यान, तीन दिवस पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत गावगाडा मध्ये ६२ तर आम जनरल मध्ये ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. रविवारी झालेल्या अंतिम दिनी बक्षिस वितरणात मंचावर कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे , देवस्थानचे अध्यक्ष रमेश गाऊत्रे , अरुण नक्षणे , जुगलकिशोर जयस्वाल , मुकुंदराव मेश्राम , भालचंद्र मांडवकर , मंगेश आसुटकर , भाऊसाहेब ताजने , विलास नक्षणे , अफजल खान पठाण , हरिदास ठावरी , जगदीश रामटेके यांची उपस्थिती होती.

 

आम जनरल स्पर्धेत अनुक्रमे विजयी ठरलेल्या अक्षय ताजने – करणवाडी , प्रकाश ठाकरे – फाळेगाव , रणजित धांदे – कोलही , सागर बंबल- यवतमाळ , श्याम उमरे टाकरखेडा , दुर्गेश कोल्हे बाभूळगाव , अनिल पवार साखरा , संत जगन्नाथ बाबा वेगाव (हेटी), जय नित वणी , सुरेश पाचभाई वेगाव , संत जगन्नाथ बाबा रुईकोट , स्वप्नील उपरे सिंधी वाढोणा यांना तर गाव गाडा मधून जगन्नाथबाबा वेगाव , संतोष गोडे घोंसी , जय नित वणी , तणवीर काकडे पंगडी , गुणवंत वांढरे रांगणा , शामराव उमरे टाकरखेडा , नत्थुजी गोडे करणवाडी , राजू हेपट हटवांजरी , या विजयी ठरलेल्या शेतकऱ्यांना बक्षिसांची रोख प्रमुख अतिथी यांचे हस्ते वितरित करण्यात आली.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीपक डोहणे यांनी मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment