Breaking News

सीईओ च्या मार्मिक उत्तराने मारेगावचे विद्यार्थी भारावले

◆ मुख्याधिकारी-विद्यार्थ्यांत प्रश्नोत्तराचा सुसंवाद
◆ टाकळी, सिंधी शाळेचा विद्यार्थ्यांचा सहभाग

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

आयएएस ची तयारी करण्याकरिता काय करावे लागते.आय. ए. एस. होण्यासाठी किती तास अभ्यास करावा लागतो.सर्वप्रथम तुम्ही कोणत्या पदाचा कार्यभार सांभाळला.या पदावर येण्याकरिता कोणकोणत्या अडचणी आल्या. तुमच्या कुटुंबात कोणी आय. ए. एस. आहे काय . तुमचे आदर्श कोण? तुमचा आवडता छंद कोणता? जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी या पदावर पोहोचू शकतो का? असे अनेकोत्तर प्रश्न करीत जिल्हा परिषद सिईओ व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सीईओच्या कक्षात २२ फेब्रुवारी रोजी रंगला.

बाला अंतर्गत झेप संवाद उपक्रमा च्या माध्यमातून प्रशासकीय सेवा संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. मारेगाव पंचायत समिती अंतर्गत कुंभा केंद्रातील टाकळी व सिंधी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्रमोद सूर्यवंशी व व गटशिक्षण अधिकारी नरेंद्र कांडूरवार यांच्या मार्गदर्शनातून ही भेट घडविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखासह सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी जिल्हा परिषद सिईओ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे मार्मिक उत्तर दिले. प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठ स्तरावर काम करीत असतांनाचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर ठेवले. पारिवारिक स्थितीसह शैक्षणिक प्रगती कशी साध्य करता येईल याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी श्रुतिका रामपुरे, पपीता टेकाम, मोरेश्वरी जीवतोडे ,संबोधी नरांजे ,प्रेम महाकुलकार ,मानवी बर्डे ,मानवी काकडे, धनश्री सोनटक्के, चैतन्य डाहूले ,अनुज
खेवले सर आधी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उच्चपदस्थ अधिकाऱ्याची भेट झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment