Breaking News

मार्डी येथे धनोजे कुणबी समाज प्रबोधन मेळावा

◆ खा.बाळू धानोरकर उद्घाटक

मार्डी – केशव रिंगोले

मारेगाव तालुक्यातील धनोजे कुणबी समाजाला सामाजिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने मार्डी येथे धनोजे कुणबी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या 5 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात होणाऱ्या मेळाव्याचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांचे हस्ते होणार आहे.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते वामनराव चटप असतील.

आमदार प्रतिभाताई धानोरकर , भालचंद्र चोपणे , विश्वास नांदेकर , टीकाराम कोंगरे , संजय देरकर , आशिष कुळसंगे , अँड.देविदास काळे , तारेंद्र बोर्डे , सुनील कातकडे , संजय खाडे , अरुणा खंडाळकर , डॉ.मनीष मस्की, वसंतराव आसुटकर , अरविंद ठाकरे , रविंद्र धानोरकर , अशोक धोबे , गजानन खापणे , सुभाष पिंपळशेंडे , रविराज चंदनखेडे , मारोती गौरकार , सुधाकर डाहुले आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

समाजातील तमाम नागरिकांनी प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धनोजे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment