Breaking News

मारेगावचे पेट्रोलपंप जनतेला समर्पित

◆ कोनशिलेचे बटन दाबून पो.महानिरीक्षक नाईकनवरे यांनी केले उद्घाटन

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

पोलीस प्रशासन व भारत पेट्रोलियम यांनी ऋणानुबंध जोपासत मारेगावसह वाहन धारकांच्या सेवेसाठी पेट्रोलपंपची उपलब्धता करण्यात आली. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी कोनशिलेचे बटन दाबून पेट्रोलपंपचे रितसर उद्घाटन आज दि.२३ गुरुवार ला केले.

स्थानिक पोलीस स्टेशनच्या प्रांगणात उभारलेल्या भारत पेट्रोलपंप उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार होते.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड , उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार , उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळेकर , तहसीलदार दीपक पुंडे , नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की ,बी.पी.सी.एल.चे क्वॉडीनेटर गजेंद्र कुशवाह यांची मंचावर उपस्थिती होती.

उद्घाटनपर बोलतांना नाईकनवरे म्हणाले , मारेगावचे पेट्रोलपंप चालवितांना पारदर्शकता राहील.पेट्रोलपंपची उपलब्धताच पोलीस व भारत पेट्रोलपंप सहकार्यातून उभारण्यात आली.पोलिस वेलफेअर कडून २४ तास चालणाऱ्या पेट्रोल डिझेल पंप व यातून मिळणाऱ्या उत्पादनातून पोलिस वेलफेअरच्या कर्मचाऱ्यांना मदतीचा ओघ देण्याचे सूतोवाच करीत वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती विषद केली.

आमदार बोदकूरवार यांनी पोलीस विभागाने गाळेचा प्रश्न मार्गी लावून बेरोजगार यांनी रोजगार उपलब्ध करून देण्याची भूमिका मांडली.

कार्यक्रमाचे प्रस्तावित गजेंद्र कुशवाह , सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे तर ठाणेदार राजेश पुरी यांनी आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment