◆ सप्तसुर संगीत कला मंच चा पुढाकार
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मराठी हिंदी गजल प्रेमींसाठी मारेगाव ( जि. यवतमाळ ) येथे विदर्भ स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या 26 फेब्रुवारी रोजी आयोजित स्पर्धेसाठी सप्तसुर संगीत कला मंच पुढाकार घेत आहे.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक अनुक्रमे 15000 , 10000 , 8000 , 6000 , 3000 असून यासह प्रोत्साहनपर प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे तीन बक्षिसे ठेवण्यात आले आहे.
स्थानिक नगरपंचायतच्या प्रांगणात होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन लोढा मल्टी स्पेशालिस्टचे संचालक तथा प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य डॉ.महेंद्र लोढा यांचे हस्ते होणार आहे.
सदरील स्पर्धेत संगीत प्रेमींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सप्तसुर संगीत कला मंच चे शशिकांत निमसटकर , प्रदीप जगताप , रवी घुमे , सतीश निब्रड , नर्रेंद्र वैद्य , अभिलाष राजूरकर यांनी केले आहे.