Breaking News

धक्कादायक…सगणापूर येथे गढूळ पाण्याचा पुरवठ्याने गॅस्ट्रोची लागण

◆ नागरिकांचे आरोग्य प्रभावित

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मागील आठवड्यापासून मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे सार्वजनिक पाणी पुरवठ्यातून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेकांना गॅस्ट्रोची लागण होऊन नागरिकांचे आरोग्य प्रभावित झाले आहे.

मानवाची मूलभूत गरज असलेल्या गढूळ पाण्याचा पुरवठा मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे होत आहे.प्रत्येक घरी नळयोजना येथे कार्यान्वित आहे.गावालगत असलेल्या नाल्याशेजारी विहीर आणि बोर असून येथील पाणी जलकुंभात सोडण्यात येते. जलकुंभातुन पाणी घरगुती व सार्वजनिक नळातून नागरिकांची तहान भागविते. मात्र मागील दहा दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील जनतेचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बालक , महिला पुरुषांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने हा आकडा फुगण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.परिणामी आरोग्याचा प्रश्न प्रभावित झाला असून यावर तात्काळ उपाययोजना करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची तसदी प्रशासनाने घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती , तहसील प्रशासनास दिलेल्या निवेदनातून दिला आहे.यावेळी ग्रा.पं. सदस्या विशमता चौधरी , वैभव वेले , निळाबाई वानखेडे , चंद्रकला जीवने , पुष्पा जीवने , नंदाबाई चौधरी , शांता मोडणकार , मनाबाई ठावरी , चंद्रकला भोयर यांचेसह बहुसंख्य पुरुष महिलांची उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment