◆ जिल्हा पोलिस कल्याण शाखेचा पुढाकार
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव शहरात जिल्हा पोलिस दल पोलिस वेलफेअर चे नव्याने उभारण्यात आलेल्या भारत पेट्रोलपंप चे उदघाटन येत्या २३ फेब्रुवारी रोज गुरुवारला सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
मारेगाव पोलीस स्टेशनच्या समोर उभारण्यात आलेल्या पेट्रोलपंपचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न औषधी प्रशासन तथा पालकमंत्री ना.संजय राठोड यांचे हस्ते होणार आहे.खा.बाळू धानोरकर , आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार , अमरावती परिक्षेत्र – विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे , प्रादेशिक प्रबंधक (बी.पी.सी.एल ) निलेश वायचल हे यावेळी प्रमुख अतिथी असतील.
उदघाटन शुभारंभचे अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड , अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप ,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार , ठाणेदार राजेश पुरी यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे.
मारेगाव येथील मुख्य रस्त्यालगत यवतमाळ जिल्हा पोलिस कल्याण शाखा अंतर्गत बी.पी.सी.एल. कंपणी द्वारा आयोजित सदरील पेट्रोल पंप मारेगावकर वाहन धारकांना आता दोन की.मी.अंतराच्या त्रासाला फुलस्टॉप मिळणार आहे.