Breaking News

देशाला शिवरायांच्या तत्वाची गरज : रुपेश रेगे

◆ शिवप्रतिष्ठाण, किन्हाळा तर्फे रक्तदान शिबिर व शिवचरित्रपर व्याख्यान 

मार्डी : केशव रिंगोले

महिला व विद्यार्थींनी वरील वाढत असलेल्या अन्याय आणि अत्याचार थांबवायचे असतील तर आज छत्रपती शिवरायांच्या तत्वाची व त्यांच्या कायद्यांची गरज असून ते कायदे अमलात आणले तरच हा प्रकार थांबेल असे प्रतिपादन वक्ते रुपेश रेगे यांनी केले.

तालुक्यातील किन्हाळा येथे आयोजित शिवजयंती उत्सवात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गंगाधर ठावरी तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा सरपंच शुभम भोयर, नानाजी आसेकर, हितेश गायधन, धिरज डांगले, प्रशांत तोरे, राहुल गानफाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील महत्वाच्या राजेंपैकी एक महत्वाचे राजे होते. जगाला आदर्श वाटावे असे एक शिवरायांचे व्यक्तिमत्व होते. लोकप्रिय, न्यायप्रिय असे जाणते राजे होते. समाजाला आदर्श असे शिवरायांचे व्यक्तिमत्व असून त्यांचे विचार व कार्य आजही समाजाला, देशाला प्रेरणादायी आहेत.

शिवरायांच्या कार्यकाळ मध्ये महिलांवर झालेले अन्याय अत्याचार त्यांनी कठोर निर्णय घेऊन गुन्हेगारांना सक्त शिक्षा सुनावली. यात प्रामुख्याने पाहिले तर रांझाच्या पाटलाची घटना सर्वश्रुत असून महिलांवरील अत्याचारा प्रकरणी शिवरायांना किती मोठ्या प्रमाणात चीड होती हे स्पष्ट होते. असे एक नाही तर अनेक दाखले इतिहासात आहेत त्यामुळे आज राज्यात व देशात वाढत चाललेल्या महिला अत्याचार शिवरायांनी केलेल्या शिक्षा कायद्यात आणणे महत्वाचे आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आदर्श कल्याणकारी राजा, जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ किन्हाळा तालुका मारेगाव यांच्या शिवजयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान रक्तदान शिबिर व जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

उन्हाळ्याचा काळ उंबरठ्यावर आला असता या काळात रुग्णांना रक्ताची जास्त गरज भासत असते व याच काळात रक्तांचा साठा कमी होतो परिणामी रक्ता अभावी रुग्णांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते. हीच गैरसोय टाळावी याकरिता जयंती महोत्सवा तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिवजयंती निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी गावात सकाळीं ग्रामसफाई, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन व स्वराज्यध्वजाचे ध्वजारोहण, सकाळी शिव व्याख्याते रुपेश रेंघेचे जिजाऊंचे संस्कार आणि शिवबाची घडण ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. व त्यानंतर दिवसभर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरात १३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायास अभिवादन केले.

दुपारच्या सत्रात सायंकाळीं सहा वाजता प्रतीक्षा गुरनुले यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश गायधन, राहुल गाणफाडे, प्रवीण देठे, आशिष तोरे, अमोल मडावी, चेतन डांगाले, गजानन बोढाले, अनंता काथवटे,राजू शात्रकार, विकास चौधरी, संजय गाणफाडे, राजू आडे, बंडू क्षिरसागर, विशाल सोमटकर, रतन आत्राम, धीरज डांगाले, माधव परचाके, योगेश काथवटे, राज चौधरी, पुष्पराज गाणफाडे, नितेश भोयर, प्रवीण काकडे, निलेश धोटे आदींनी पुढाकार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment