Breaking News

वार्ताहरला वाहिली शिव्यांची लाखोळी

◆ मार्डीत खमंग चर्चेला उधाण

◆ खोट्या बातमी मुळे पन्नास युवकांचा वार्ताहर ला थेट सवाल

मारेगाव : दीपक डोहणे

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून बातमीदारांकडे पाहिले जाते.ग्रामीण भागात आपल्या कार्यक्रमाची बातमी व नावे प्रकाशित व्हावी ही जनसामान्यांची माफक अपेक्षा असते.मात्र अलीकडेच ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाल्याशिवाय वृत्त प्रकाशित करायचे नाही असे निवडक बातमीदार कित्ता गिरवत आहे.

हे खेदजनक व लोकशाहीला घातक ठरते आहे.असाच काहीसा प्रकार मारेगाव तालुक्यात घडला .एका बहुचर्चित वार्ताहर याने दक्षिणा नाही भेटली म्हणून खोटी बातमी दिली आणि तब्बल पन्नास युवकांच्या जथ्यांने त्या वार्ताहरास चुकीच्या वृत्तांकणाचा जाब विचारत शिव्यांची लाखोळी वाहिली.ही घटना शनिवारच्या सायंकाळी पाच वाजता मार्डी येथे घडली. हा प्रकार वाऱ्यासारखा पसरत खमंग चर्चेला उधाण देत आहे. वार्ताहर च्या वृत्तपत्रांच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करीत निष्काशीत करण्याची मागणी करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील एका मराठी दैनिकाच्या वार्ताहराने केवळ सोशल मीडियावर येत असलेल्या वृत्त छापण्याच्या नावाखाली आर्थिक मलिंदा लाटण्याचा गोरखधंदा चालविला आहे.एवढेच नव्हेतर स्वतःचे अवैध प्रवासी वाहनावर ‘प्रेस’ शिर्षक देत राजरोसपणे तो अवैद्य प्रवाशांची वाहतूक करतो. पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून हे प्रकार सुरू आहे.स्वतःला मातब्बर व ‘माणिक मोती ‘ समजणारा हा वार्ताहर आहे. लगट घालून हा बेशिस्त व बोथट बातमीदार तालुक्यात बेचव झाला आहे.

नुकतेच मार्डी येथे कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.याची बातमी प्रकाशित करण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांची मागणी या कलंदर वार्ताहराने केली.सूत्रसंचालन करून देण्याची हमी व रोख अशी मागणी करणाऱ्या बहुचर्चित वार्ताहराने दोन हजार नगदी स्वरूपात घेत कार्यक्रमात अनेकांचे नावे भर व्यासपीठावर जाणीवपूर्वक गाळले. या कार्यक्रमाचा फज्जा झाला असे वृत्तांकन प्रकाशित करीत आयोजकांचा रोष ओढावून घेतला.

या अनाहूत प्रकाराने आयोजकांचा असंतोष शिगेला पोहचला .
शनिवार ला सायंकाळी 4 वाजताचे सुमारास तब्बल पन्नास युवकांनी या बहुचर्चित वार्ताहरास मार्डी बसस्थानक परिसरात गाठून झालेल्या प्रकाराचा जाब विचारत शिव्यांची लाखोळी वाहिली.यावेळेस त्या घाबरलेल्या वार्ताहराने वाहनाचे दरवाजे बंद करीत समोरील अनर्थ टाळण्यात धन्यता मानली.

हा प्रकार मार्डी च्या शेकडो नागरिकांनी डोळ्यात साठवीला .यामुळे परिसरात खमंग चर्चेला कमालीचे उधाण आले असून येणाऱ्या काळात असाच प्रकार सुरू राहिल्यास दे बत्ती’ ने आग बुझविण्याचा गर्भित इशारा युवकाकडून या वसुली बाज वार्ताहर ला देण्यात आला.

या बाबतची तक्रार आज सायंकाळ पर्यंत पोलिसात दाखल करण्यात येणार असल्याची खात्रीपूर्वक वृत्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment