Breaking News

मारेगावातून साडेतीन क्विंटल कापूस लंपास

◆ टिनाचे शेड कापून चोरट्यांनी मारला डल्ला

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

दिवसागणिक वाढत असलेल्या चोरीच्या प्रकरणात पुन्हा वाढ होत मारेगाव येथील शेतात असलेल्या शेड मधून साडेतीन क्विंटलवर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना आज मध्यरात्री घडली.

मारेगाव येथील तानबाजी श्रीरामे यांची शेती मारेगाव शिवारात आहे.शेतात असलेल्या टिनाच्या शेड मध्ये शेतातील माल व शेतीपयोगी साहित्य नेहमी प्रमाणे असतात.

विशेष म्हणजे नियमित रात्री जागली जाणार शेतकरी गुरुवारच्या रात्री शेतात गेलेच नाही आणि हाच डाव साधत अज्ञात चोरट्यानी टिनाचे शेड कापून ३० हजार रुपये किमतीचा साडेतीन क्विंटल कापसावर हात साफ केला.

मारेगाव तालुक्यात कापूस चोरीचे प्रकार चोरट्यांचा अजेंड्यावर आहे.सातत्याने थेट शेतातील चोरीचे प्रकार घडत असतांना शेतकऱ्यांनी सजगता बाळगण्याची गरज आहे.किंबहुना वाढत्या कापूस चोरीच्या घटनेत वाढ होत असतांना चोरट्यांना पकडण्यास पोलीस यंत्रणाही कुचकामी ठरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment