Breaking News

सुयश… पहापळ शाळेचे पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र

 

मार्डी – केशव रिंगोले

तालुकास्तरीय महादिप चाचणीमध्ये अंतिम फेरीत तालुक्यातील पहापळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेतील पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

यामध्ये मृणाली प्रवीण वाढई, धनश्री धर्मराज पाझारे ,आकांक्षा जनार्दन निखाडे,आरती निकेश मोहितकर आणि वेदिका विठ्ठल निखाडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे
हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी पात्र झालेले आहेत सर्व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत .

या विद्यार्थ्यांना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री नरेंद्र कांडूरवार साहेब, मुख्याध्यापकश्री. एन.टी चौधरी पदवीधर शिक्षक श्री.संजय फुलबांधे सहा. शिक्षक अमर पुनवटकर. सौ. वाघमारे मॅडम व गोंडे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गुरनुले आणि पेसा समितीचे अध्यक्ष भैय्याजी कन्नाके यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment