◆ पाच वर्षांचे बहरणारे प्रेम मारेगावच्या ठाण्यात कोमेजले
मारेगाव : दीपक डोहणे
आज व्हॅलेंटाईन डे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.या दिवसाला आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू देत प्रेम बद्ध नाते साजरे करतात.मात्र मारेगावात मागील चार वर्षांपासून बहरत असलेल्या प्रेमात प्रेयसीने प्रियकरास थेट कारागृहाची भेट ऐन व्हॅलेंटाईन डे दिवसाला देत प्रेमाचा रंग बेरंग केला.प्रियकरा विरोधात पोलिसात तक्रार देवून प्रियकर गजाआड झाल्याची घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवसाला घडल्याने हायटेक जमान्यातील अलीकडचे प्रेम हे च्युईंगम झाल्याचा प्रत्यय मारेगावात आला.
गणेशपूर (वणी ) येथील २४ वर्षीय युवक व मारेगाव येथील २३ वर्षीय युवती यांचे मागील चार वर्षांपासून प्रेम बहरत होते.एकमेकांना चोरून भेटणे , भेट वस्तू देणे यातच प्रेम घट्ट होत प्रेमातील सर्वच मर्यादा दोघांनीही ओलांडल्या.
मागील काही दिवसांपासून प्रेयसी कडून लग्नाचा तगादा सुरू झाला.प्रियकराने काही दिवस नकार देत प्रेमाच्या नात्यात वितुष्ठपणा आणल्या.मात्र प्रेम आंधळं असतं असं म्हणतात अन पुन्हा त्यांच्या प्रेमाला बहर आला.पुन्हा तिच्या कडून लगीनघाई सुरू झाली.पण त्याचा नकारघंटा सुरूच.
अशातच ती नातेवाईकांना घेऊन थेट मारेगाव पोलिसात पोहचली.प्रियकर नात्यातलाच असल्याने त्याला ठाण्यात बोलाविले.ठाणेदार राजेश पुरी यांनी कायद्याच्या परिणामांची दोघांना भूमिका विषद केली.प्रियकर लग्नासाठी तयार झाला.दोन्ही बाजूचे नातेवाईकही सकारात्मक झाले.मात्र मुलीकडील ‘एकाने’ ठिणगी टाकीत क्षणात प्रकरण तक्रारीत दाखल झाले.आणि प्रियकर अंकित हनुमान सोयाम यांचेवर लैंगिक अत्याचाराचा ३७६ गुन्हा दाखल होत प्रियकर गजाआड झाला.
आज व्हॅलेंटाईन दिवस अर्थात प्रेमाचा उत्सव साजरा करण्याच्या दिवसावर येथे प्रेमाचा रंग बेरंग झाल्याचा प्रत्यय आला.सदरील प्रकरणाचा तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनाखाली जमादार रामकृष्ण वेट्टे करीत आहे.