Breaking News

लोक कलावंत डॉ.दिलीप अलोणे यांचा आज गौरव

◆ कलोपासनेची ५० वर्ष सन्मानार्थ मारेगाव तालुक्यातील टाकरखेडा येथे नकलांचे आयोजन

◆ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पुढाकार

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव 

नकला या लोककलेला सन्मान मिळवून देत कलोपासण्याची पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल वणी जिल्हा यवतमाळ येथील लोक कलावंत नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांचा आज गौरव करण्यात येणार आहे.

शेतकरी शिक्षण संस्था संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने तालुक्यातील टाकरखेडा येथे आज सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या निमित्ताने नकलांच्या कार्यक्रमाही आयोजन करण्यात आला असून नकलाकार रामझिले हे सहभागी होत आहे. सह्याद्री दूरदर्शनचे आनंद कसंबे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र हे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न राज्य आहे.ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहे.समाजाच्या विविध गटातून तयार झालेला हा प्रकार लोककलेतून साकार होत लोकरंगभूमी विकसित झाली.मागील अनेक दशका पासून डॉ. अलोणे लोककला रंगभूमीची बीजे पेरत आहे.हाच लोककलेचा धागा पकडून त्यांना गौरविण्यात येणार आहे.

सदरील कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब देशमुख असून या कार्यक्रमाचा तमाम जनतेंनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment