नवरगाव : संदीप कोवे
मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे समस्त ग्रामवासी यांच्या सौजन्याने दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सोमवारला रात्री आठ वाजता ग्रामपंचायत नवरगाव चे प्रांगणात सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार व समाजिक प्रबोधनकर संत खंजिरी वादक उदयपाल महाराज वणीकर यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
सप्त खंजिरी वादक सामाजिक प्रबोधनकार व कीर्तनकार यांच्या कार्यक्रम सामाजिक दृष्टिकोनातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरा, अंधरूढी,जातिवाद,मतभेद, गुन्हेगारी अशा घातक गोष्टी समाजातून नष्ट व्हाव्यात आणि गावातील व परिसरातील सामाजिक बंधुभाव व सलोखा वाढविण्याचा व कायम राहण्याचे दृष्टीने व समस्त बहुजन समाज जागृती व उन्नतीच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गावातील तसेच परिसरातील समस्त नागरिकांना आयोजित प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त नवरगाव ग्रामवासीकडून करण्यात आले आहे.