◆ अत्यल्प आजारात काळाच्या झडपेने सर्वत्र हळहळ
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील राजू आण्याजी ताठे (५१) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी वणी रुग्णालयात निधन झाले.अत्यल्प आजाराच्या काळाच्या झडपेने मारेगाव शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
राजू ताठे हे मासिक बचतचा व्यवसाय करायचे.मागील गुरुवार दि.९ फेब्रुवारीला सकाळी त्यांना भोवळ येऊन मार्डी चौकात पडले होते.लगेच त्यांना मारेगाव रुग्णालयात हलविण्यात येऊन पुढील उपचारार्थ वणी येथील अर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.शुक्रवारी त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर असल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.परिणामी हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यल्प असल्याने प्रकृती साथ देत नव्हती.आज सकाळी साडेसहा वाजता राजू ताठे यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी सोनाली , मुलगा ओम , थोरला भाऊ व दोन बहिणी आहे.
आज शनिवारला दुपारी १ वाजता स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.