Breaking News

निवड…. मारेगाव तालुका काँग्रेस महिला अध्यक्षपदी मायाताई गाडगे

◆ संघटन मजबुतीवर भर देण्याचे सूतोवाच

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मारेगाव तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करून उभारी देण्यासाठी येथील समाजसेविका मायाताई हरिश्चंद्र गाडगे यांची मारेगाव तालुका महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मारेगाव येथे झालेल्या पक्षीय चिंतन बैठकीत ही निवड करण्यात आली.
तालुक्यात शेकडो गावे संलग्नित असतांना प्रामुख्याने युवती व महिलांना मुख्य सामाजिक व राजकीय प्रवाहात आणून काँग्रेसच्या संघटन मजुबुतीवर भर देत प्रत्येक गावात पक्षाचे जाळे विणण्याचे सूतोवाच यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा यांनी केले.
परिणामी , पक्ष संघटनेची जबाबदारी सक्षमपणे पेलण्यासाठी गाडगे यांनी अध्यक्ष पदाच्या निवडीचे श्रेय खा.बाळू धानोरकर , माजी आमदार वामनराव कासावर , नरेंद्र ठाकरे , अरुणाताई खंडाळकर , डॉ.महेंद्र लोढा , तालुका अध्यक्ष मारोती गौरकार , वसंतराव आसुटकर , गणुजी थेरे, अंकूश माफुर , नगरसेवक आकाश बदकी यादवराव पांडे , तुळशीराम कुमरे , दयानंद कुडमथे , विनोद आत्राम, वंदनाताई आवारी यांना दिले.
याप्रसंगी उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले तर मायाताई गाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment