◆ बेंबला प्रकल्प प्रशासनाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
अस्मानी सुलतानी संकटात भरडलेल्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर आता बेंबला प्रकल्पाचे भूत बसत आहे.शेतातील खोदकाम करीत असतांना बेंबला प्रकल्प प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट शेतात कामाचा सपाटा लावल्याने शेताचे प्रचंड नुकसान होत आहे.संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा पिडीत शेतकऱ्याने दिला आहे.
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील विठ्ठल सूर्यभान पचारे या शेतकऱ्याची शेतजमीन धानोरा शिवारात असून त्यांच्या शेतात बेंबला कालवे प्रकल्प प्रशासनाने अनधिकृत खोदकाम व आऊटलेटचे कामे सुरू केले आहे.त्यामुळे शेतीची ऐसीतैशी होत असल्याने यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान , प्रशासनाच्या मुजोरीत दिवसागणिक वाढ होत असतांना आधीच शेतकऱ्यावर संकटाचे चक्रव्यूह मागावर असतांना आता प्रकल्पाचे भूत मानगुटीवर बसून शेतीचे प्रचंड नुकसान करीत आहे.संबंधीतावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून शेताची नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा नाईलाजाने मला जीवन संपवावे लागेल असा गर्भित इशारा पिडीत शेतकरी विठ्ठल पचारे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता यवतमाळ व ठाणेदार मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.