◆ गडचिरोली विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे औचित्य
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
लोकमान्य टिळक महाविद्यालयतील अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रा. करमसिंग राजपूत यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे संपन्न होणाऱ्या 47 व्या विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आल्याबद्दल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयचे प्राचार्य, प्रा. डॉ. अविनाश घरडे सर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रा. डॉ. खाडे , प्रा. डॉ. गुंडावर ,प्रा. डॉ. पवार आणि प्रा.डॉ. गायकवाड आदींची उपस्थिती होती.