Breaking News

मारेगावात १३ लाखाच्या बनावट जाफराणीवर छापा

स्थानिक गुन्हे शाखा व अन्न औषधी प्रशासन विभागाची सयुक्त कारवाई

 दीपक डोहणे : मारेगाव

शासनाकडून बंदी असलेल्या सुगंधित जाफराणीवर मारेगाव येथे आज रविवारला छापा टाकून किमान १६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.मारेगाव शहरात या कारवाईने व्यवसायिकांचे प्रचंड धाबे दणाणले आहे.

मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १७ मधील मस्जिद शेख यांचे गोडावून मध्ये आज सायंकाळी चार वाजताचे दरम्यान अन्न औषधी प्रशासन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून किमान १३ लाखाची जाफराणी व तीन लाखाचे चार चाकी वाहन असे एकूण १६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

पुढील गुन्हा अन अटकेची कारवाई वृत्त लिहिपर्यंत मारेगाव पोलिसात सुरू होती.दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांचे मार्गदर्शनात सहा. पो.नि. अमोल मुडे , घनश्याम दंडे , प्रदीप परदेशी, जमादार आनंद आचलेवार यांनी ही कारवाई केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment