Breaking News

रंगनाथ स्वामी पतसंस्थेत ग्राहकाची झुंबड

◆ ग्राहकाची ठेवी उचलीकडे वाढता कल

कैलास ठेंगणे : मारेगाव 

तालुक्यासह यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात नावलौकिकास प्राप्त ठरलेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेत गैरप्रकार झाल्याचा आरोप- प्रत्यारोप झाला. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने ग्राहकांनी मुदतपूर्व ठेवी उचल करण्याकरिता एकच धावपळ सुरू केली आहे. दररोज शाखा उघडतात कोटी रुपयाचे ठेवीची उचल केला जात असल्याने पतसंस्था डबघाईस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मारेगाव शहरात महाकुलकर कॉम्प्लेक्स मध्ये पतसंस्थेची शाखा आहे. या शाखेत तालुक्यातील हजारो नागरिकांच्या कोटींनी ठेवी ठेवल्या आहे.तसेच दैनंदिन अल्पबचत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे .मात्र मागील काही दिवसापासून पतसंस्थेतून कामावरून कमी केलेल्या वरोरा व वणी येथील अभीकर्ते व कर्मचाऱ्यांनी संस्थे विरुद्ध बंड पुकारले. तशी पुराव्यानिशी सहकार विभागाकडे तक्रारी दाखल केली. याची माहिती ग्राहकांना पडतात संस्थेच्या शाखांमध्ये ग्राहकांची एकच झुंबड उडाली. पै- पै जमा केलेली पुंजी सुरक्षित हलविण्याकरीता ग्राहक संस्थेत धाव घेत आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या शाखेत कधी न एवढी चिकार गर्दी पाहायला मिळत आहे. दररोज कोटी रुपयांच्या वर ठेवी ग्राहक काढत आहे. त्यामुळे पतसंस्था कलंकीत होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

संस्थेचे अध्यक्ष काय म्हणतात…..

संस्थेच्या २२ शाखा आज कार्यरत आहे. सर्वच शाखेतील ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित आहे. पतसंस्थेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. पतसंस्थेत ज्या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आले आहे. पतसंस्थेची बदनामी करणाऱ्या लोकांविरुद्ध मानहानीचा दावा लवकरच दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे ग्राहकांनी निसंकोच राहावे

अँड. देविदास काळे

अध्यक्ष ,रंगनाथ स्वामी पतसंस्था, वणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment